कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने दुध दर कपात मागे घेऊन दर पूर्ववत करावे, या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील चिलिंग सेंटर आज आंदोलन अंकुश संघटनेने बंद पाडले. दुधाची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवल्या. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

गोकुळ दूध संघाने गेल्या महिन्यात गाय दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी केले आहेत. हे दर पूर्ववत करावे यासाठी सतत आंदोलने सुरू होत आहेत. याच मागणीसाठी आज आंदोलन अंकुश संघटनेने उदगाव येथील गोकुळचे चिलिंग सेंटर बंद पाडले. या सेंटर कडे जाणाऱ्या गाड्या रोखून धरल्या.

हेही वाचा… Maharashtra News Live : मुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या विचारा – संजय राऊत

दूध दरवाढ झालीच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाही , दरवाढ आमच्या हक्काची अशा जोरदार घोषणा देत आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा… Navratri 2023: भाविकांच्या गर्दीत महालक्ष्मीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकार म्हणतंय गाईच्या दुधाला प्रतिलिटर कमीत कमी ३४ रुपये दर द्यावा लागेल. पण सरकार मध्ये असलेले व गोकुळचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आपल्याच सरकारचा निर्णय पाळावा असा वाटत नाही. दुध उत्पादकांनी या दरात गाई पाळायला परवडत नाही. यासाठी हे आंदोलन हाती घेतले आहे असे दोन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.