कोल्हापूर : राज्य सरकारकडून सरळसेवा पद्धतीने तलाठी भरती प्रक्रियेच्या परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले आहे. परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना २०० मार्कांच्या पेपरला २१४ मार्क पडले असल्याचे प्रकार समोर आल्याने परीक्षा कशा पारदर्शक पद्धतीने झाल्या असतील हे दिसून येते. यामुळे सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाकडून घ्याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोमवारी केली.

हेही वाचा : जखमा अजुनी ओल्या; संभाजीराजे छत्रपती यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत

गेल्या अनेक वर्षांपासून सरळसेवा भरती प्रक्रियांमध्ये ज्या कंपन्यांमार्फत पेपर घेतले जातात, त्या घोटाळा करतातच. हे बऱ्याचवेळेस सिद्ध झाले आहे. यामुळे अनेकदा सरकारवर नामुष्की येऊन शासनास परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आतासुध्दा तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार, होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : कोल्हापूर : पावनगडावरील अनधिकृत मदरशा अखेर जमीनदोस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे, असे जर सरकारचे म्हणणे असेल तर या निकालपत्रातील २०० पैकी १२५ पेक्षा जास्त गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांची एमपीएससी परीक्षा घेऊन त्यांना पात्रता सिद्ध करण्याची संधी द्यावी , अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.