कोल्हापूर : देशासाठी बलिदान देणारे भारत मातेचे पुत्र शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनी शाहू महाराज यांनी अभिवादन केले. शनिवारी सागरमाळ येथील हुतात्मा स्मारक उद्यानात शहीद दिनाचे औचित्य साधून आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.

हेही वाचा : शाहू महाराजांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजीराजेंची वडिलांसाठी खास पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूर शहरातील विविध पक्ष संघटनांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला शाहू महाराज आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच हुतात्मा स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाला आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक संदीप देसाई, माणिक मंडलिक, भूपाल शेटे, अनिल घाटगे ,दुर्गेश लिंग्रस, राजू साबळे, समीर कुलकर्णी, काका पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर संघटिका स्मिता सावंत, सर्जेराव साळोखे, शिवाजीराव पाटील, उमेश पवार, अनुप पाटील, दिलीप पेटकर, विनायक सूर्यवंशी, यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.