कोल्हापूर : अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या कोल्हापूर विभागीय अंतिम फेरीत कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजच्या ‘पार करो मोरी नैय्या’ ही सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली. ही एकांकिका मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवडली गेली आहे. प्राथमिक फेरीतून सहा एकांकिकांचा सहभाग असलेली विभागीय अंतिम फेरी केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये पार पडली. सर्वच एकांकिकातील कलाकारांनी समरसून अभिनय केला. त्याला नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना याचीही नेटकी साथ मिळाली.

स्पर्धेतील विजेत्या संघांना चित्रपट, नाट्य अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक संजय मोहिते यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी परीक्षक प्रदीप वैद्या, अमित वझे, नाट्य अभ्यासक उदय कुलकर्णी, आयरिश प्रोडक्शनचे प्रतिनिधी अनुपम दाभाडे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, संचालक संजय पाटील, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह विनोद कांबळे, शाहीर डॉ. राजू राऊत आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : मग ते वानखेडे , ब्रेबाँन… कोठेही शपथ घेऊ शकतात; हसन मुश्रीफ यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांना टोमणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर्जेदार, वैविध्यपूर्ण सादरीकरण

कोल्हापूर केंद्रातील विभागीय अंतिम फेरीतील एकूणच सादरीकरण वैविध्यपूर्ण तितकेच दर्जेदार होते. यामुळे स्पर्धेमधील चुरस जाणवत होती. लिखाणाचे वेगळेपण जाणवत होते. देश, तरुण पिढी, तिची संवेदनशीलता याविषयीचे प्रश्न मांडले गेले होते.- प्रदीप वैद्या, परीक्षक