कोल्हापूर : दहा प्रवाशांना घेऊन निघालेल्या मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती घळीत जाऊन कोसळली. सोमवारी झालेल्या अपघातात एक महिला मृत्यू पावली. तर चार महिला, पाच मुले जखमी झाली आहेत. लालबी कलबुर्गी (रा. तारदाळ) या महिलेचा मृत्यू झाला आहे.

तारदाळ येथील सनदी कुटुंबीय हे पूर्वी रेणुका नगर येथे राहत होते. अलीकडे ते संगम नगर, तारदाळ येथे राहण्यास गेले आहेत. आज ते नांदणी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी मोटारीरून जात असताना हा अपघात घडला. यद्राव येथील ओढ्याजवळ दुचाकी वाहनास चुकवताना मोटारीच्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ती रस्त्याकडेला घळीत पडली.

हेही वाचा : कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाची उद्या संयुक्त पाहणी; याचिकाकर्ते पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून नागरिक मदतीसाठी धावले. अपघातात गंबीर जखमी झालेल्या लालबी कलबुर्गी यांचा मृत्यू झाला. ५ मुले व ४ महिला यांना दुखापत झाली आहे असून या सर्वांना इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.