शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे पुढे आली आहेत. याकडे आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी मंत्रिमंडळात सत्तार यांना शिक्षण मंत्री करायला हवे, असा टोला लगावला.

टीईटी घोटाळा : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे?

पत्रकार परिषदेत बोलत असताना चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या कामगिरीवर टीका केली. ते म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांची वाताहात झाली आहे. तशी अवस्था भारतात निर्माण होत आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू झाली आहे. उदारमतवाद शिल्लक राहणार का असा प्रश्न निर्माण झाला असून लोकशाही धोक्यात आली आहे.”

…तर विरोधकांचे अस्तित्व संपून जाईल –

तसेच, “विरोधक संपवून टाकण्याची भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलून दाखवत आहेत. ईडी, सीबीआय अशा संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात आहे. देशातील जनता सुज्ञ होऊन अशा प्रकाराविरुद्ध आवाज उठवला नाही तर विरोधकांचे अस्तित्व संपून जाईल.” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

“माझ्या परिवाराची चूक असेल तर मी गुन्हेगार आहे, नाहीतर…”, टीईटी घोटाळा प्रकरणी अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे –

महाराष्ट्रातील सत्ता बदलाच्या घटनाक्रमा विषयीही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. “राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीने मंत्रिमंडळाचा शपथविधी घडवून आणला. नव्या बदल्यानुसार किमान १२ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात असणे आवश्यक असताना केवळ दोघांचेच मंत्रिमंडळ दीड महिना झाला तरी सुरू आहे. यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे.”, असेही चव्हाण म्हणाले.