कोल्हापूर : किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त बाबतच्या आंदोलनावेळी हिंसाचाराने मोठे नुकसान झालेल्यांना मदत वाटप सुरु झाले आहे. ५६ कुटुंबाना ५० हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले.

गजापूरपैकी मुसलमानवाडी (ता. शाहुवाडी) या गावामध्ये रविवारी अतोनात नुकसान झाले होते. मुसलमानवाडी येथील अंदाजे ४१ घरांची जमावाने नासधुस केल्याने प्रापंचिक साहित्याबरोबरच घरांचेही नुकसान झालेले होते. नुकसानीबाबत विस्तृत अहवाल पंचनामे करुन शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेला आहे.

हेही वाचा – विशाळगडावर यासीन भटकळ आल्याची चौकशी – हसन मुश्रीफ

हेही वाचा – विशाळगड प्रश्नास पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल रेखावार जबाबदार; विशाळगड रक्षण समितीने फोडले खापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाडीमध्ये अंदाजे ५६ कुटुंबे रहातात. त्यांना शासनातर्फे तातडीची मदत म्हणून येडगे यांच्या हस्ते प्रापंचिक साहित्यासाठी २५ हजार रुपये आणि घर दुरुस्तीसाठी ४१ घरांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत धनादेशाव्दारे देण्यात आली. प्रांताधिकारी समीर शिंगटे उपस्थित होते.