कोल्हापूर: ओंजळभर फुलं द्या आणि साखरेची माळ घेऊन जा, अशी मोहीम येथे गुढीपाडव्यासाठी राबवली जात आहे. पर्यावरणपूरक गुढीपाडव्यासाठी महिलांसाठी वनस्पतीजन्य रंगांपासून साखरेची माळ तयार करण्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली.

येथील दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय, संचलित निसर्ग मित्र परिवार यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. पराग केमकर, जयश्री सुर्वे, अस्मिता चौगुले, रूपाली परीट, कस्तुरी जाधव, मेघा पाटील वैष्णवी गवळी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर म्हणाल्या, या सर्व उपक्रमांमधून महिलांना रोजगार निर्मिती करून लोकांना विविध वस्तू उपलब्ध करून द्याव्यात. यातून प्रत्येक सण उत्सव हा पर्यावरण पूरक होण्यास हातभार लागेल.

वनस्पतींपासून साखरेच्या माळा

बेल, बहावा, कढीपत्ता, हळद, बीट, पुदिना, शेंद्री, पारिजातक, गोकर्ण या वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांपासून साखरेच्या माळा राणिता चौगुले यांनी तयार करून दाखविल्या.

ओंजळभर फुलं आणि साखरेची माळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील वनस्पतींची ओंजळभर फुलं आणून दिल्यास त्यांना त्यापासून बनवलेली साखरेची माळ दिली जाणार आहे. ही मोहीम गुढीपाडव्या पर्यंत राबवण्यात येणार आहे. हे वनस्पतीजन्य रंग, अक्षतांचे तांदूळ रंगवण्याकरिता, रांगोळी मध्ये, हळद खेळण्याकरिता अशाकरिता देखील वापरावे. सण झाल्यानंतर कडुलिंब पाल्यापासून धान्य सुरक्षित राहण्यासाठी कडुलिंब गोळ्यांचा वापर करावा. गुढी सोबतच कडुलिंबाचे रोप दत्तक घेऊन त्याचे संगोपन करावे,असे निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी सांगितले.