कोल्हापूर : गणपतीची मूर्ती चौथ्या मजल्यावरुन खाली आणताना लिफ्टची रोप वायर तुटल्याने खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. भगवान नामदेव कांबळे (वय ४८.रा.विक्रमनगर ,मुळ गाव पासार्डे ता.करवीर ) असे त्याचे नाव आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला.

हेही वाचा – काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

मृत भगवान कांबळे हा संत गोरा कुंभार येथे गेल्या दोन महिन्यापासून बाजीराव कुंभार यांच्याकडे काम करीत होता. शुक्रवारी चौथ्या मजल्यावरून गणपतीची मूर्ती खाली आणताना तो आणि गुहागर येथील कामगार असे दोघे जण लिफ्टमधून खाली येत असताना लिफ्टची वायर तुटल्याने ही दुर्घटना घडली. नातेवाईकांनी भगवान यांना बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.