कोल्हापूरकरांचे अभ्यंगस्नान होणार थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच होणार हे स्पष्ट झाले आहे.कोल्हापूर शहराला पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी काळमवाडी नळ पाणी योजना आखण्यात आली. मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण असताना या योजनेच्या कामाचा शुभारंभ झाला होता. गेली आठ, नऊ वर्ष या योजनेचे काम सुरू होते. त्यामध्ये अनेक अडथळे येत होते.

हेही वाचा >>> सरसेनापती कारखान्याच्या या हंगामातील साखर विक्रीचे अधिकार राजू शेट्टींना; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणी आज येणार नंतर येणार असे आश्वासन दिले जात होते. गेली दोन-तीन वर्षे तर यावर्षी दिवाळीची अंघोळ काळम्मावाडी योजनेच्या पाण्याने होणार असे सांगितले जात होते. पण आता मात्र यावर्षी दिवाळीचे अभ्यंगस्नान कळमवाडीच्या पाण्याने होणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळेच आता रात्री कोल्हापुरात सर्वत्र आनंद उत्सव साजरा केला जात आहे. आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नाला यश नववर्षांनी झाली कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्ती रात्री अकरा वाजता पुईखडी प्रकल्पात पाणी पोहोचले.