कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूक आणि चपलांचा खच असे एक नवे समीकरण कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. कालही हेच चित्र मिरवणूक मार्गावर ठसठशीतपणे दिसून आले. शुक्रवारी दिवसभरात चार डंपर भरेल इतक्या चपला गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्याची वेळ महापालिका आरोग्य विभागावर आली.
हेही वाचा >>> कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा आशियाई स्पर्धेत सुवर्णवेध




कोल्हापुरात गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणूक वाजतगाजत पार पडली. विसर्जन मिरवणुकीतील गर्दी, ढकलाढकलीमुळे अनेकांची चप्पल पायातून निसटली. गर्दीत त्या शोधणे अशक्य होते. हजारोंना अनवाणी घरी जावे लागले. परिणामी आज मिरवणुकीचा मुख्य मार्ग असणाऱ्या महाद्वार रस्त्यावर सर्वत्र शेकडो चपलांचे ढीग दिसून आले. चपला गोळा करताना आरोग्य विभागाची भलतीच दमछाक झाली. महापालिका कर्मचाऱ्यांनी जवळपास चार डंपर भरून या चपला नेल्या. गेल्या वर्षीही असाच प्रकार मिरवणूक मार्गावर घडला होता.