कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील सांगली रोडनजीक काळ्या ओढ्यावर सीइटीपीच्या जलवाहिनीस गळती लागली आहे. त्याचबरोबर ड्रेनेज फुटले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात मैला पंचगंगेत मिसळत आहे. याबाबतची माहिती इचलकरंजी नागरिक मंचला मिळाल्यानंतर तातडीने महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
हेही वाचा – राज्यात आता समाजवादी पार्टीही स्वबळावर; आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ३५ जागा लढविणार
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
याबाबतचे व्हिडीओ पाठवल्यानंतर सीईटीपी प्रकलपाद्वारे काम सुरू असताना सदर प्रकार घडल्याचे उघडकीस आले. याबाबत दुरुस्तीचे काम हाती घेत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कळवले. अशातच तेथील ड्रेनेज फुटल्याने मोठ्या प्रमाणावर मैला काळ्या ओढ्याद्वारे पंचगंगेत मिसळणार आहे. त्याचेही काम महापालिकेतर्फे हाती घेण्यात येत असल्याचे कळवले आहे.