कोल्हापूर : ‘उरी होई धडधड… छत्रपतीऽऽऽ…’ या रोमारोमात स्फुल्‍लिंग चेतवणार्‍या टायटल साँगचा घुमणारा स्वर…. ढोल-ताशांच्या निनादाला कैचाळाची लयबद्ध साथ… हलगीच्या कडकडाटाची लहर… कार्यकर्त्यांचा श्री. शाहू छत्रपती यांच्या जयजयकाराच जयघोष, महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दिलेली भक्‍कम एकजुटीची साक्ष आणि त्या साक्षीला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांच्या मोहोळ अशा सळसळत्या, उत्साहवर्धक वातावरणात लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीने प्रचंड शक्तिप्रदर्शन करत एकजूट दाखवून दिली. रणरणत्या उन्हाची तमा न करता जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यामुळे दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर अक्षरश: महाजनसागर लोटला होता. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या जनतेने शाहू छत्रपतींच्या विजयाचा निर्धार पक्का केला. हात उंचावत कोल्हापूरची अस्मिता शाहू छत्रपती, शिवशाहूंचा विचार दिल्लीला पाठवू या अशा घोषणा देत या समुदायाने संपूर्ण जिल्हा महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचे ग्वाही दिली.

Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
shalini patil vishal patil
शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”
kolhapur lok sabha seat, Sanjay Mandlik, Clarifies Controversial, against shahu maharaj, opponents deliberately distorted statement, shahu maharaj adopted statement, kolhapur shahu maharaj, shivsena, congress,
माफी मागायचा प्रश्नच नाही; दत्तक वारस विरोधातील उग्र जनआंदोलनाचा इतिहास जाणून घ्यावा – संजय मंडलिक

आणखी वाचा-युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी

फुलांनी सजवलेल्या वाहनात खास तयार करण्यात आलेल्या ओपन टफमध्ये श्री शाहू छत्रपती यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षातील प्रमुख नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, शरद पवार गट राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्‍वास नारायण पाटील, शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर, माजी आमदार सुरेश साळोखे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, माजी संचालक रामराजे कुपेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, आपचे संदीप देसाई, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे यांच्यासह विविध संस्था, संघटना व पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती या रॅलीमध्ये सहभागी होत्या. यामुळे कार्यकर्ते व नागरिकांच्या उत्साहात आणखी भर पडली. मिरवणूक मार्गावर ‘कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, जनतेचा निर्धार… शाहू महाराज खासदार’ ही घोषणा दुमदुमली. इंडिया आघाडी व महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या २८ हून अधिक पक्षांच्या प्रमुखांचा, पदाधिकार्‍यांचा व कार्यकर्त्यांचा या मिरवणुकीत सहभाग होता. यातून महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन घडले. या प्रचंड शक्‍तीप्रदर्शनाने कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून श्री शाहू छत्रपतींना दिल्‍लीत पाठवण्याचा नारा अधिकच बुलंद झाला. कार्यकर्त्यांनी डोक्यावर पक्षाच्या टोप्या, गळ्यात मफलर तर कुणी फेटे परिधान केले होते. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, आरपीआय, भाकप, माकप, लाल बावटा, संभाजी ब्रिगेड, लोकजनशक्ती पार्टी अशा विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व शहरातील वेगवेगळ्या संस्था, तालीम संघटना, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांची उपस्थितीही मोठी होती. मिरवणूक मार्गावर पक्षाच्या विजयाच्या घोषणाच्या देत कार्यकर्त्यांनी तसेच महिला कार्यकर्त्यांनीही फेर धरला. फडफडणारे झेंडे, विजयाच्या घोषणा यामुळे मिरवणूक मार्गावर चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते.

आणखी वाचा-बैलगाडीने जात राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ‘स्वाभिमानी’चे जोरदार शक्तीप्रदर्शन

रॅलीच्या अग्रभागी धनगरी ढोल व हलगी पथक होते. त्या पाठोपाठ कार्यकर्त्यांचा ताफा होता. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांचे, पदाधिकार्‍यांचे प्रतिमा असलेले फलक घेऊन कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला होता. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा ‘शाहू छत्रपती की जय’ असा घोषणा केल्या. ‘कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. यानंतर शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीच्या प्रमुख निवडक नेते मंडळीसोबत जाऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. शाहू छत्रपती यांनी ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

रॅलीमध्ये नागरिकांच्या सुविधासाठी सरबतची व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. मुस्लिम बोर्डिंग येथे गणी आजरेकर आणि कादर मलबारी यांनी कार्यकर्त्यांसाठी कोकम सरबतची सोय केली होती. ते स्वतः आणि समाजातील कार्यकर्ते सरबत वाटप करीत होते. तर मानसिंग बोंद्रे फौंडेशनच्यावतीने व माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांच्या पुढाकाराने ३० हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे या रॅलीत वाटप करण्यात आले.