लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : नग्न फोटो पाठव; अन्यथा ठार मारेन, अशी धमकी देणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाला मंगळवारी पोलिसांनी शिताफीने अटक केली. अमरनाथ कृष्णा दप्तरदार (वय २२, राहणार गोकुळ शिरगाव ) असे त्याचे नाव आहे. त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

अमरनाथ व संबंधित तरुणी हे एका महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. अंबरनाथ हा समाज माध्यमातून तिला अश्लील संदेश पाठवत असे. ही माहिती तरुणीने कुटुंबीयांना दिली होती. त्यावर तिच्या कुटुंबीयांनी अमरनाथ याची भेट घेऊन समजावून सांगितले होते.

आणखी वाचा-कोल्हापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरीही त्याच्या वाह्यात वागण्यात बदल झाला नव्हता. उलट त्याने इंस्टाग्राम या समाज संदेशातून त्रास द्यायला सुरुवात केली. तुझे नग्न फोटो पाठव; अन्यथा तुला ठार मारेन, अशी धमकी त्याने दिली होती. सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्याआधारे निर्भया पथकाने सापळा रचून त्याला सापळा रचून पकडले. त्याने पोलिसांनी या कृत्याची कबुली दिली आहे.