कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी नविद मुश्रीफ यांचे नाव निश्चित होणे ही माझी हतबलता होती, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी व्यक्त केले.

मी कोल्हापूर जिल्हा बँकेचा अध्यक्ष असल्याने गोकुळ अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांना स्थान देणार नाही, असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले होते. पण गोकुळच्या राजकारणाचा सारिपाट मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याने बदलून मंत्रिपुत्र नविद यांना अध्यक्षपदाचा मुकुट घालण्यात आला. याचे स्पष्टीकरण पत्रकारांना देताना मंत्री मुश्रीफ यांनी मनीची हतबलता व्यक्त केली.

या पदाच्या निवडीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केल्याचे मान्य करून हसन मुश्रीफ यांनी त्यांचा आभारी असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान मुश्रीफ यांनी नविद यांचे अभिनंदन करतानाच त्यांना गोकुळच्या कारभाराविषयी सूचनाही दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिता-पुत्रांकडे सत्तासूत्रे

कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघाचे अध्यक्षपद एकाच घरात आल्याने हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव वाढला आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आहेत. दोन्ही संस्थांचा कारभार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट चुलीशी जोडला गेला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ता जिल्ह्यातील पुढाऱ्यांना हवीच असते.