गत गळीत हंगामातील थकीत एफआरपी आणि दुसरा हप्ता देण्याची मागणी करत शुक्रवारी  रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्या टेबलावर साखर ओतली. याप्रश्नी  तातडीने कार्यवाही न झाल्यास  खासदार राजू शेट्टी, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानावर मोच्रे काढण्याचा इशारा  देण्यात आला.

२०१५ -१६ या वर्षांत झालेल्या साखर हंगामातील एफ आर पी ची उर्वरित ४५ रुपये  रक्कम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त २ कारखान्यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या साखर नियंत्रण कायद्यानुसार १४ दिवसाच्या आत ही  रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र अद्यापही ती दिली गेली नाही. त्यामुळे या कायद्याचा भंग कारखान्यांनी केला आहे. त्याचबरोबर सध्या बाजारात साखरेचे भाव ३ हजार ८०० रुपये प्रतिक्वटल आहेत. त्यामुळे साखर कारखाने फायद्यात आहेत. सहकाराच्या नियमानुसार हा फायदा सभासद शेतकर्यांना देण्याची गरज आह. सध्याच्या बाजारभावाचा  विचार करता ५०० रुपये ज्यादा देण्यात येणे शक्य आहे .  याप्रश्नी  साखर सहसंचालकांनी शेतकर्याची बाजू घेऊन लक्ष देण्याची मागणी करत आज  आंदोलन करण्यात आले . शेतकरी संध्या आíथक संकटात असून त्यांच्या हक्काचे हे पसे मिळावेत अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे साखर सहसंचालक सचिन रावळ यांना देण्यात आले. याबाबत योग्य निर्णय न झाल्यास खासदार राजू शेट्टी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यसह खासदार आणि आमदारांच्या दारात आंदोलन करण्याचा इशार या वेळी जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी दिला . यावेळी पी. जी. पाटील, आदम मुजावर, दिलीप माणगावे, गुणाजी शेलार, गोरख चंदनशिवे आदी उपस्थित होते.