रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात येथील राष्ट्रीय स्केटिंगपटू ठार झाली. समीक्षा राजेंद्र मांगले (वय १२, रा. थोरात चौक, इचलकरंजी ) असे तिचे नाव आहे. तर तिची आई वैष्णवी मांगले या जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.
समीक्षा मांगले ही थोरात चौक परिसरात आपल्या कुटुंबीयासमवेत राहण्यास होती. तिने स्केटिंगमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. मंगळवारी ती वडील राजेंद्र आणि आई वैष्णवी यांच्यासोबत मोटारसायकलवरून हुपरी येथे कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम आटोपून इचलकरंजीकडे परतत होते. रेंदाळ येथील राम मंदिराजवळ आले असता त्यांची दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात समीक्षा ही जागीच ठार झाली. तर वैष्णवी मांगले या जखमी झाल्या. त्यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्केटिंगपटू समीक्षा हिचा अपघाती मृत्यू झाल्याने या भागात हळहळ व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2016 रोजी प्रकाशित
ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात राष्ट्रीय स्केटिंगपटू ठार
अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ
Written by लोकसत्ता टीम

First published on: 03-03-2016 at 03:45 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National sketing player killed in tractor bike accident