लोकसत्ता प्रतिनिधी

कोल्हापूर: इचलकरंजी महापालिकेच्या दुसऱ्या आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे यांची बुधवारी नियुक्त करण्यात आली. त्यांच्याकडे प्रशासक पदाचाही पदभार असणार आहे. आज ते महापालिकेत पदभार स्वीकारणार आहेत.

इचलकरंजी महापालिकेची स्थापना वर्षभरापूर्वी झाली. पहिले प्रशासक म्हणून डॉ. सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिका सभागृह अस्तित्वात असल्याने त्यांच्याकडे प्रशासक म्हणून कारभार सोपवण्यात आला. आता या दोन्ही जबाबदारी नवनियुक्त अधिकारी ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे असणार आहेत. इचलकरंजी येथे आयुक्तपदी येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा होती. त्यामध्ये आजी- माजी लोकप्रतिनिधी यांचाही समावेश होता.

आणखी वाचा-कागल विधानसभा लढून विक्रमी मताधिक्याने जिंकणार; समरजितसिंह घाटगे यांची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुक्त म्हणून प्रथमच

दिवटे हे सध्या भिवंडी निजामपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त आहेत. नगर विकास विभागातील २३ वर्षाच्या सेवेनंतर त्यांच्याकडे आयुक्त पदाची जबाबदारी प्रथमच सोपवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कोल्हापूर, सांगली,मीरा-भाईंदर महापालिकेत काम केले आहे. ठाणे येथे ते उपायुक्त होते. त्यानंतर त्यांनी भिवंडी येथे काम पाहिले. इचलकरंजी येथे आयुक्त म्हणून काम करण्याचा त्यांचा पहिलाच अनुभव असेल.