scorecardresearch

Premium

कोल्हापुरातील दोन जनऔषधी केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी जन औषधी केंद्रांचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी झाला.

Janaushadhi Centers in Kolhapur
उदगावात जन औषधी केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी जन औषधी केंद्रांचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी झाला.

शिरोळ तालुक्यात उदगाव विकास सेवा संस्था तसेच पन्हाळा तालुक्यात पोखले येथील श्री बलभीम विकास सेवा संस्था येथे हा कार्यक्रम पार पडला. पोखले येथील कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी समीर शिंगटे, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Supriya Sule pune
लोकांच्या कामासाठी कोणाकडेही जाण्यास काहीच अडचण नाही – सुप्रिया सुळे
Sabha Mandap spread over 26 acres for Prime Minister Narendra Modis meeting in yavatmal
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तब्बल २६ एकरांवर सभा मंडप, काय आहे वैशिष्ट्ये जाणून घ्या
Director General of Police Rashmi Shukla warns Naxalites in Gadchiroli
‘‘नागरिकांच्या सहकार्यानेच नक्षलवाद संपवू,” नक्षल्यांच्या गडातून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा इशारा…
Shiv Sena statewide convention begins in Kolhapur in the presence of the Chief Minister
शिवसेनेच्या महाअधिवेशनात मोदी-शहांच्या अभिनंदनाचे ठराव; कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ

हेही वाचा – अवकाळी पावसाने कोल्हापूरला पुन्हा झोडपले

हेही वाचा – ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ- चंद्रकांत पाटील या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

उदगाव येथील कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक, संस्थेचे अध्यक्ष विजय कर्वे, सहाय्यक निबंधक अनिल नांद्रे आदी उपस्थित होते. बाजारातील ब्रँडेड कंपन्यांपेक्षा ७० ते ९० टक्के स्वस्त असणारी जन औषध केंद्रातील औषधे वापरावीत, असे आवाहन करण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm inaugurated two janaushadhi centers in kolhapur ssb

First published on: 30-11-2023 at 19:28 IST

आजचा ई-पेपर : कोल्हापूर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×