उद्यापासून पुढील दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिला आहे. मध्यम ते अतिवृष्टी असे पावसाचे स्वरूप असण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यात दिलासा देणारे वृत्त भारतीय वेधशाळेने दिले आहे. १५  मार्च ते १७ मार्च या तीन दिवसांमध्ये वादळी पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दक्षता घेण्याचे आवाहन

यापैकी सातारा, सोलापूर, कोल्हापूर सांगली या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक, मध्यम, अति आणि अतिवृष्टी असे पावसाचे स्वरूप असणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.