लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची बंद असलेली मोहीम पुन्हा तातडीने सुरू करावी, मलिक रेहान दर्गा हटवावा, अशी मागणी येथे आयोजित धरणे आंदोलनावेळी करण्यात आली.

हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशाळगडावरील अतिक्रमण तत्काळ हटवावे, मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान बाबाच्या दर्ग्याचे अतिक्रमण जमीनदोस्त करावे, गडावरील उरुसाला कायमस्वरूपी बंदी घालावी, कोणत्याही प्रकारची पशुहत्या करण्यात येऊ नये तसेच गडावरती नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांचे स्मारक उभे करण्यात यावे, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी मागण्यांचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला. न्यायालयाच्या आदेशानुसार विशाळगडावरील मोहीम सुरू करू, असे आश्वासन येडगे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. दीपक देसाई, संजय जाधव, विष्णुपंत पाटील, चंद्रकांत बराले, गजानन तोडकर, संदेश देशपांडे, बाळासाहेब मोहिते, शिवभक्त उपस्थित होते.