खासदार राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारने दुधाची दरवाढ लागू केली आहे, मात्र ही दरवाढ फक्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्यतील दूध संघच देत आहेत. इतर जिल्ह्यंतील दूध संघ दरवाढ देण्यास टाळाटाळ करत असून, दुधाची दरवाढ राज्यात सगळय़ाच दूध संघांना लागू करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध संघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली. फडणवीस यांनी दुधासंदर्भात उपाययोजना अमलात आणण्यासाठी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती प्रस्ताव सादर करेल. त्यावर या उपाययोजना अमलात आणल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दूध दरप्रश्नी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बठक पार पाडली.  या वेळी राज्यात जवळपास ३० दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, की शेतकरी आंदोलनानंतर सरकारने राज्यात दुधाला तीन रुपये प्रतिलीटर दरवाढ केली, मात्र  दुधाची दरवाढ करण्यास टाळाटाळ केली जात आहे. याचा फटका राज्यातील दूध उत्पादकांना बसत आहे. तसेच राज्यात अतिरिक्त दूध झाले आहे, त्यासाठी शासनाने त्यावर प्रक्रिया  करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा त्वरित उभी करावी.

तसेच केंद्र सरकारकडे दूध पावडरला निर्यात अनुदान म्हणून १० टक्के देण्याची मागणी केली आहे. राज्यात एकूण दुधापकी १० टक्के दूध हे भेसळयुक्त आहे.  दूध भेसळीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी अनेक दूध संघांनी दूध धंद्यासंदर्भात येत असलेल्या अडचणी मांडल्या.

यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरीलप्रमाणे आश्वस्त केले. तसेच राज्यातील सर्वच दूध संघ एकाच ब्रँडखाली यावेत. जेणेकरून राज्यातील दुधाचा धंदा सुरळीत पार पडेल. राज्यात दुधाची मोठी बाजारपेठ असून, ती इतर राज्यांनी बळकावण्याऐवजी एकच ब्रँड करून दूध संघांनी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे ठाम मत त्यांनी मांडले. तसेच दूध धंद्यासाठी चढउतार निधीची तरतूद करण्याचे आश्वासनदेखील या वेळी त्यांनी दिले. या वेळी आमदार अमल महाडिक, महानंदा दूध संघाचे माजी अध्यक्ष विनायकदादा पाटील, गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापक डी. बी. घाणेकर, राज्याचे दुग्धविकास सचिव, गिरीश चितळे, सोनाई दूधचे मोहन माने आदींसह विविध दूध संघांचे अध्यक्ष तसेच खासगी दूध संघांचे मालक उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetti comment on devendra fadnavis over milk issue
First published on: 26-07-2017 at 01:07 IST