कोल्हापूर: इचलकरंजी – कोल्हापूर आणि अर्जुनवाड – मिरज या रेल्वेमार्गावर २०१८ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विशेष प्रयत्नातून मी उड्डाणपूल मंजूर करून आणला. यापैकी इचलकरंजी – कोल्हापूर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले असून विद्यमान खासदार हे समर्थकामार्फत स्टंटबाजी करत श्रेय लाटण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

इचलकरंजी – कोल्हापूर रस्त्यावरील रुकडी येथील रेल्वे उड्डाणपूल काल खुला झाला. या कामाचे श्रेय खासदार धैर्यशील माने यांचे असल्याची फलकबाजी करण्यात आली होती. याला उत्तर देताना शेट्टी म्हणाले,२००९ साली मी लोकसभेचा सदस्य झाल्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे या कामासाठी पाठपुरावा करत होतो. २०१८ साली सुरेश प्रभू यांनी वरील दोन्ही कामांना मंजूरी दिल्यावर पुढील वर्षी निविदा प्रसिध्द होवून कामास सुरवात झाली. महारेल कंपनीने या कामाबाबत हलगर्जीपणा केल्यावर संबधित अधिकारी व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे पाठपुरावा करून कंपनीकडून काम करून घेण्यात आले.

आणखी वाचा- महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा एकदा वादात; कोल्हापुरात पुन्हा स्पर्धा होणार- दिपाली सय्यद यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी गावातील पूल बांधा

धैर्यशील माने यांच्या कुटूंबात जवळपास ४० वर्षे खासदारकी आहे. या अवधीत त्यांचे जन्मगाव रूकडी गावात रेल्वे उड्डाणपूल व रूकडी -चिंचवाड पंचगंगा नदीवर पूल बांधणे शक्य झाले नाही. मी मंजूर करून आणलेल्या पुलाच्या कामाचे उद्घाटन करून स्वत:चे हसे करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्टंटबाजी करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न माने कुटुंबियांनी करू नये, असा टोला शेट्टी यांनी लगावला.