कोल्हापूर : शिरोळ – कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर मोटारीत एका तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी घडली. संतोष विष्णू कदम ( वय ४५, रा.सांगली) असे त्याचे नाव आहे. तो माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता आहे. कुरुंदवाड- नांदनी मार्गावरील रस्त्याकडेला निळ्या रंगाची मोटार थांबली होती.

हेही वाचा >>> कोल्हापूर: अंबादास दानवे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेनेतील दोन गटातील संघर्ष शिगेला

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Major fire at Marathwada University premises
विद्यापीठ परिसरात आग; अग्निशमन विभागाचे अधिकारी, जवान घटनास्थळी दाखल
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

पेट्रोल संपले असल्याने ते आणण्यासाठी चालक गेला असेल या समजुतीने मोटारीकडे बराच वेळ कोणाचे लक्ष गेले नव्हते. शंका आल्याने बघ्यांनी डोकावून पाहिले असता गाडीमध्ये तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला असल्याचे दिसून आले. कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. त्यांनी शोध घेतला असता मृतदेह महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता समितीचे राज्य युवक सहकार्यवाह संतोष कदम यांचा असल्याचे दिसून आले.