कोल्हापूर : शरद पवार यांनी माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांच्या वर २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत खालच्या पातळीवर टीका केली होती. बैल जुना झाला तर तो कसायाकडे द्यायचा असतो असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पराभूत केला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकी वेळी शरद पवार यांनी असेच विधान वाढदिवसा करावे. त्यामुळे माझी निवडणूक सोपे होईल,अशा शब्दांत खासदार संजय मंडलिक यांनी गुरुवारी हल्लाबोल केला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज महा  विकास आघाडी कडून निवडणूक लढणार आहेत, या चर्चेकडे लक्ष वेधले असता मंडलिक पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शाहू महाराज लोकसभेला उमेदवार असतील असे मला वाटत नाही..ज्या बातम्या येतात त्यावर विश्वास ठेवू नका. तरीही ते उमेदवार असतील तर आमचे वडीलकीचे नातं बदलणार नाही. ही निवडणूक दोन पक्षातील विचारांवरच होईल.

हेही वाचा >>>श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीला उभे राहू नये असे वाटते; हसन मुश्रीफ

केंद्रीय गृह मंत्री, भाजपचे नेते अमित शहा आणि संजय मंडलिक यांच्या गुप्त भेटीची चर्चा होत आहे. त्यावर खासदार मंडलिक यांनी, अमित शहा यांना मी अलीकडे भेटलेलो नाही. जेंव्हा मी शिवसेनेत पक्षप्रवेश केला; त्यावेळी भेटलो होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे सक्षम नेते आहेत. त्यामुळे अन्य कोणाला भेटलो नसल्याचा निर्वाळा दिला.