कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकार मंडळाच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून माजी खासदार संजय सदाशिवराव मंडलिक तर उपाध्यक्ष म्हणून अमित आनंदराव देसाई यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्ष पदासाठी मंडलिक यांचे नाव भाऊसाहेब देसाई यांनी सुचविले. त्यास विजय पोळ यांनी अनुमोदन दिले. देसाई यांचे नाव प्रवीण सूर्यवंशी यांनी सुचविले व त्यास सुहास बोंद्रे यांनी अनुमोदन दिले. अध्यासी अधिकारी मिलिंद ओतारी यांनी निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करून मंडलिक व देसाई यांचा सत्कार केला.

संजय मंडलिक म्हणाले, जिल्ह्याच्या सहकार पंढरीत संघाची नवीन अद्ययावत इमारत उभी करून विविध प्रशिक्षणांचे आयोजन करून सहकार चळवळीला दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यव्यापी सहकार परिषद भरवून त्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सहकार तज्ज्ञांना आमंत्रित करणार आहोत.

मंडलिकांचे स्मारक उभारणार

लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या अथक प्रयत्नामुळे सहकार मंडळाची इमारत खरेदी करण्यात आली. त्यांचे योगदान लक्षात घेता नवीन इमारतीमध्ये त्यांच्या नावे स्मारक म्हणून प्रशिक्षण सभागृह बांधण्यात येणार आहे, असे संचालक भाऊसाहेब देसाई यांनी सांगितले.

राज्यव्यापी करू

सहकार बोर्डाने .आज पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ३३ राज्य सहकारी परिषदे घेतली. दोन महाविद्यालये,पाच विभागीय सहकारी मंडळे,१३ सहकार प्रशिक्षण केंद्रे आणि ३३ जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शहराबरोबरच ग्रामीण भागातील अती दुर्गम परिसरात पोहोचून सहकारी शिक्षण ,प्रशिक्षण दिली आणि देत आहे. लोकांनी स्वेच्छेने यात सहभाग घेतला. सहकारातच आपले कल्याण आहे, त्यामुळे सहकाराचा प्रसार, प्रचार होणे गरजेचे आहे .असा विचार प्रवाह पुढे येवू लागला.

सप्टेंबर १९१७ मध्ये पुण्यात एक सहकार परिषद बोलावली गेली. या परिषदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींसह देशाच्या काना कोपऱ्यातून सहकारातील कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात सहकाराशिवाय तरणोपाय नाही असा सूर या परिषदेत घुमू लागला.प्रथम लोकांना सहकार काय आहे याची कल्पना द्यावी लागेल आणि प्रशिक्षण द्यावे लागेल याबाबतीत महात्मा गांधी यांनी जोर धरला. आणि त्यासाठी राज्यात एक राज्यस्तरीय सहकारी शिक्षण, प्रशिक्षण देणारी यंत्रणा असावी असे मत मांडले.आणि तेथेच ख-याअर्थाने महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज हीच संस्था १०० वर्षे पूर्ण करीत आहे. या