कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ निमित्त आज सकाळी १०० सेकंद उभे राहून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त कोल्हापूर शहर आणि जिल्हा १०० सेकंद स्तब्ध झाला होता. शनिवारपासून आठवडाभर कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

६ मे २०२२ रोजी शाहू महाराजांची शंभरावी पुण्यतिथी होती. या निमित्ताने शासनाच्या वतीने शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ आयोजित केले आहेत. त्याचा सांगता समारंभ आज होत आहे. शनिवारी (६ मे) शाहू महाराज समाधी स्थळ येथे मानवंदना, दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना मानवंदना, स्मृति शताब्दी सांगता कार्यक्रम आदी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय ७ मे पासून आणखी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राची लोकधारा, शिल्पकला मातीकाम प्रशिक्षण, चित्र रेखांकन व रंगकाम कार्यशाळा, ॲनिमेशन आणि कार्टून फिल्म निर्मिती कार्यशाळा, लोककला सादरीकरण आधी कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे.
सकाळी १० वाजता एकाचवेळी झालेल्या या उपक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर,अधिकारी, नागरिक, विद्यार्थी,पालक सहभागी झाले होते.