कोल्हापूर : जमीन खरेदीच्या व्यवहारात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी शिरोळ तलाठी व  महसूल सहाय्यक यांना सोमवारी प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. स्वप्नील वसंतराव घाटगे ( वय – ३९ वर्षे. पद – तलाठी, मूळ  रा. रुकडी, ता. हातकणंगले) व  शिवाजी नागनाथ इटलावार ( वय ३२ वर्षे, पद- महसुल सहायक, तहसीलदार कार्यालय, शिरोळ, सध्या रा. कसबा बावडा,कोल्हापूर, मुळ रा. कुंडलवाडी, ता.बिलोली, जि.नांदेड ) अशी त्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार यांचे संबंधितांचे जयसिंगपूर येथील डवरी वसाहतीत असलेल्या प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याबाबत केलेल्या अर्जाचे कामकाज हे तक्रारदार पाहत होते. तरी सदरचा तक्रार अर्ज हा जयसिंगपूर येथील तलाठी घाटगे यांचेकडे दिला होता. सदर क्षेत्रफळ दुरुस्ती करून सात बारा उतारा मिळणेकरिता  घाटगे यांनी तहसीलदार शिरोळ यांच्याकरिता तसेच तहसील कार्यालय येथील क्लार्क शिवाजी यांच्याकरिता व खाजगी टायपिस्ट यांच्याकरीता तक्रारदार यांच्याकडे २७,५०० रुपयेची मागणी केली होती. तसेच  इटलावार यांनी तलाठी घाटगे यांनी सांगितलेप्रमाणे  तक्रारदार यांच्याकडे ५,००० हजार रुपयेची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्याप्रमाणे आरोपीं विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे, असे पर्यवेक्षण  अधिकारी  सरदार नाळे,पोलीस उप अधीक्षक यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shirol talathi revenue assistant arrested in case of accepting bribe amy
First published on: 27-02-2024 at 02:19 IST