कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा येथे प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज प्रारंभ करण्यात आला.
या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू जनतेला अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. स्वस्त दरात, स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना निश्चितपणे उपयुक्त होईल, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली.
सुभाष रोड येथील रुद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंट येथे शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई बचत गटाच्या सदस्य उपस्थित होत्या. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज येथे महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते, ताराबाई रोड येथील श्री महालक्ष्मी भक्तमंडळ येथे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते तसेच साईक्स एक्स्टेंशन मधील हॉटेल साईराज येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते योजनेस प्रारंभ करण्यात आला.