कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना विरोधकांची इंडिया आघाडी बनण्याआधी तुटत आहे. राहुल गांधी ज्या राज्यात यात्रा घेऊन जात आहेत, तिथली आघाडी तुटत आहे. सगळे मित्र पक्ष आघाडी सोडून चालले आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी वर्षभरात ३-४ महिने सुट्टीवर असतात. मोदींनी एकदाही सुट्टी नाही घेतली, अशी तुलना त्यांनी केली.

शेतकऱ्यांना भरभरून दिले

भारत रत्न स्वामिनाथन यांनी दिलेल्या अहवालापेक्षा भाजपने शेतकऱ्यांना अधिक काही दिले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात चर्चेसाठी सर्वांना दरवाजे उघडे आहेत, असे त्यांनी उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात विधान केले.

हेही वाचा – महालक्ष्मी मंदिरासाठी ४० कोटी, पावनखिंड विश्रामगृहासाठी १५ कोटी मंजूर

भाजपमध्ये स्वागतच

ईडीची भीती घालून विरोधकांना भाजपमध्ये घेतले जात आहे असा आरोप केला जात आहे. याबाबत बोलताना चौहान म्हणाले, आम्ही कोणाला आमच्याकडे उचलून आणले नाही. आमच्याकडे ते स्वतःहून येत आहेत. आम्ही कोणाला दरवाजे बंद करू शकत नाही.

पवारांचे अस्तित्व संपले

शरद पवार यांच्याकडे आता काहीही राहिलेले नाही. त्यांचे अस्तित्व काहीही उरले नाही. त्यांना आता बोलायला आणि करायला काहीही शिल्लक नाही, अशी टीका चौहान यांनी केली.

हेही वाचा – ‘एफआरपी’ वाढीमुळे साखर उद्योगावर आर्थिक संकट!

मोदी हेच तारणहार

गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची सर्व क्षेत्रात प्रगती सुरू आहे. विरोधकांची अवस्था अत्यंत दुबळी आहे. त्यांच्याकडून देशाच्या प्रगतीसाठी कोणतेही काम होणार नाही असा लोकांना विश्वास वाटत आहे. विरोधकांकडे नेता, नीती, नेतृत्व नाही. याउलट भाजपकडे मोदी यांचे दृष्टे नेतृत्व आहे, अशी तुलनाही चौहान यांनी यावेळी केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली शक्तिशाली आणि विकसित भारत बनत आहे. प्रत्येक देश आता भारताचा जयजयकार करत आहे. प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलली पाहिजे, अशा अशा शब्दात चौहान यांनी मोदी यांच्या नेतृत्वावर शब्दसुमने उधळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूर चप्पल

मी ४५ वर्षांनंतर कोल्हापुरी चप्पल घेतली. एका सहलीला मी इथे आलो होतो. त्यावेळी मी चप्पल घेतली होती. आता आज धनंजय महाडिक यांना बोललो मला चप्पल घ्यायचे आहे आणि घेवून टाकली, अशी आठवण आज शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी केली.