सीपीआरमधील सहकारी महिला डॉक्टरचे छुप्या पद्धतीने चित्रीकरण करणाऱ्या डॉक्टरवर महिला लंगिक अत्याचार प्रतिबंध समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सोमवारी सांगितले. याबाबतची तक्रार संबंधित युवतीने समितीकडे केली असून, समिती याची दोन दिवसांत चौकशी करणार आहे.
या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी फनीकुमार किरण कोटा (वय ३१, रा. मूळ हैद्राशाहकोट, तेलंगणा, सध्या रा. तुलसी बिल्िंडग सीपीआर)याच्या विरुद्ध शनिवारी दोषारोपपत्र दाखल केले होते.
सीपीआरमधील तुलसी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या फनीकुमार किरण कोटा या डॉक्टरने आपल्या सहकारी महिला डॉक्टरचे मोबाइलद्वारे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी संबंधित युवतीने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी फनीकुमार कोटा याला अटक केली होती. दरम्यान, फनीकुमार कोटा याच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्रासोबत पोलिसांनी फनीकुमार कोटा याच्या मोबाइलमधील मेमरी कार्ड, तसेच त्या क्लिपची डिटेल जोडली आहे. सीपीआर प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित युवतीने याबाबतची तक्रार महिला लंगिक अत्याचार निवारण प्रतिबंध समितीकडे केली आहे. तसेच पोलिसांनी न्यायालयात जे दोषारोपपत्राची कागदपत्रे समितीकडे दिली जाणार आहेत. संबंधित महिला तसेच फनीकुमार यांच्याकडे समिती चौकशी करणार आहे. चौकशीअंती समिती आपला अहवाल अधिष्ठातांकडे सादर करणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर फनी कोटा याच्याविरुद्ध कारवाई करणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
सातसदस्यीय समिती
महिला लंगिक अत्याचार प्रतिबंधसमितीमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये प्राध्यापक, सेवाभावी संस्थामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2016 रोजी प्रकाशित
सहकारी महिला डॉक्टरचे छुप्या पद्धतीने चित्रीकरण
सीपीआर प्रशासनाची या प्रकरणी गांभीर्याने दखल
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-01-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shooting by hidden way of cooperative women doctor