कोल्हापूर : पुरातत्त्व खात्याच्या निरीक्षणानुसार श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत असल्याने मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करावी, अशी मागणी देवीभक्त सकल हिंदू समाजाने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

मूर्तीची झीज होत असल्याच्या कारणामुळे पुरातत्व खात्याच्या निर्देशानुसार वर्ष १९९७ पासून महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा बंद करण्यात आली आहे. १४ मार्च रोजी केंद्रीय पुरातत्व खात्याने श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची पाहणी केल्यानंतर मूर्ती सुस्थितीत असल्याचा निर्वाळा दिला आहे. सध्या मूर्तीच्या संवर्धनाची तात्काळ आवश्यकता नसून भविष्यात गरज लागल्यास संवर्धन करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले गेले आहे.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी

हेही वाचा… विकासकामांसाठी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींची ‘युती’

हेही वाचा… कोल्हापूर : गारगोटीत जोरदार वळीव पाऊस; गारपिटीमुळे पिकांचे नुकसान

‘देवीभक्त सकल हिंदू समाजा’चे शरद माळी म्हणाले की, हिंदु धर्म शास्रानुसार मूर्तीमधील चैतन्य जागृत रहाण्यासाठी कोणत्याही देवतेवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू असणे अत्यावश्यक असते. ही परंपराच बंद असल्याने समस्त देवीभक्तांच्या श्रद्धांचे हनन होत आहे. महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर अभिषेक बंद असल्याने देवीभक्त अस्वस्थ आहेत. अगोदर पुरातत्त्व खात्याने मूर्तीची स्थिती चांगली नसून, मूर्तीची झीज रोखण्यासाठी आणि मूर्ती संवर्धन होण्यासाठी मूर्तीस रासायनिक लेपन करण्याचा उपाय सांगितला होता. त्यानुसार पुरातत्व खात्याकडून रासायनिक लेपन करण्यातही आले; मात्र तरीही मूर्तीची झीज झाल्याच्या वृत्त आल्याने भक्तांना चिंता लागून राहिली होती. हिंदु धर्म शास्रानुसार मूर्तीमधील चैतन्य जागृत रहाण्यासाठी कोणत्याही देवतेवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू असणे अत्यावश्यक असते. ही परंपराच बंद असल्याने समस्त देवीभक्तांच्या श्रद्धांचे हनन होत आहे. पुरातत्त्व खात्याच्या खात्याच्या नवीन अहवालाच्या संदर्भाने कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांनी लवकर पुढाकार घ्यावा’. यावेळी राजू यादव, सुमेध पोवार, रामभाऊ मेथे, शिवानंद स्वामी हे उपस्थित होते.