कोल्हापूर : आजोबांना भेटण्यासाठी घेतलेली ‘त्या’ बालकाची धाव मृत्यूला कारणीभूत ठरली. पर्यटनासाठी आलेल्या बालक मोटारीखाली सापडल्याने मृत्यू पावल्याची घटना बुधवारी पन्हाळा येथे घडली. इंद्रनील अरुण दबडे (वय २, रा. खानापूर ता. भुदरगड) असे या बालकाचे नाव आहे.
दबडे कुटुंबिय जोतिबा येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून ते जवळच्या पन्हाळगडावर आले. तेथील ऐतिहासिक सज्जा कोटी पाहण्यासाठी मी निघाले होते. तबक उद्यान येथे चहापानासाठी ते थांबले होते. इंद्रनील हा आईजवळ उभा होता. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या आजोबांकडे तो धावू लागला. याचवेळी सुधीर कुमार हांडे (रा. करमाळा) यांच्या मोटारीच्या चाकाखाली तो सापडला. गंभीर जखमी झालेल्या इंद्रनील याला ग्रामीण रुग्णालयातून कोल्हापुरात हलवण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला.