कोल्हापूर : निवासिनी महालक्ष्मी देवीच्या चैत्री हिंदोळा पूजा सोहळा शुक्रवारी मंगलमय वातावरणात पार पडला. देवीचे अनोखे रूप नजरेत साठवण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अक्षय तृतीयेला सायंकाळी महालक्ष्मी देवी झुल्यावर बसते. देवीचे चोपदार, वाजंत्री देवीला निमंत्रण करण्यास गाभाऱ्यात जातात. याचवेळी इकडे गरुड मंडपात चांदीने मढवलेले सिंहासन फुलांनी सजवून ते लाकडी छताला बांधले जाते.

साज, चाफेकळी, मोहन माळ, तन्मणी अशा पारंपारिक दागिन्यांबरोबरच देवीचा खास रत्नजडित कुंडल देवीला घातला जातो.देवीच्या शागिर्दांनी घरून आणलेली कैरीची डाळ, पन्हे, पानसुपारी देवीला अर्पण केली जाते. चोपदार झोके देतात आणि सनई चौघड्याच्या तालावर रात्री आठ पर्यंत हा सोहळा रंगतो महिला भक्तिभावाने हळदीकुंकू सोहळ्यामध्ये सहभागी होतात.

हेही वाचा…अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोल्हापुरात सोन्याची खरेदी उत्साहाने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्या गर्भवतीला डोहाळे पूर्ण करण्यासाठी झुल्यावर बसवून झुलवले जाते. तसे संपूर्ण सृष्टीला सृजनाचे स्वप्न पडले आहे आणि त्या सृष्टीच्या सृजनाची ही देवता होय. वसंत ऋतूपासून सृजनाचा आनंदोत्सव सुरू होतो. म्हणूनच देवीला झोपाळ्यावर बसवून या उत्सवाला प्रारंभ केला जातो, असेही ॲड. प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.