शाहूवाडी तालुक्यातील मानोली धरणाजवळ उभारण्यात आलेला प्रवासी टोल नाका आज तेथील व्यावसायिकांनी बंद पाडला. टोल आकारणी पुन्हा सुरू केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
आंबा – विशाळगड मार्गावर मानोली धरण आहे. तेथे वन हक्क समिती व मानोली गाव यांच्या वतीने प्रवासी टोल नाका १० दिवसापूर्वी उभारण्यात आला हो. टोल आकारणीवरून सातत्याने तक्रारी वाढत चालल्या आहेत. यामुळे या परिसरातील हॉटेल व्यावसायिक व अन्य व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन टोल आकारणी बंद पाडली. पुन्हा तसा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सरपंच अनिल वायकूळ, निलेश कामेरक,र अंकुश पाटील यांच्यासह व्यावसायिक सहभागी झाले होते.
