लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कर्नाटकातून कोल्हापुरात येऊन घरफोड्या करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून ८६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज कित्तुरकर (रा. हालशी ) व महादेव नारायण धामणीकर (रा. कित्तूर, दोघेही तालुका खानापूर) अशी त्यांची नावे आहेत.

कर्नाटकातील दोन युवक मुरगूड येथे चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी येणार असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. तेथे राज हा आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने महादेव धामणीकर यांच्या साथीने कोल्हापुरात घरफोड्या केल्याची कबुली दिली.

आणखी वाचा-Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळासाठी ६४ एकर जमिनीचे ऑक्टोबरपर्यंत संपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते चोरी केलेल्या दुचाकीवरून यायचे. चोरी केल्यानंतर दुचाकी सीमा भागात सोडून देत. तेथून बसने गावी जात. त्यानंतर सोने आपापसात वाटून घेत असत. त्यांच्याकडून फेडरल बँक शाखेत तारण ठेवलेले २३३ ग्रॅम आणि धामणीकर याच्याकडील ६९४ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. राज याने मुत्थुट फिनकॉर्प खानापूर यांच्याकडे तारण ठेवलेले दागिने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.