कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात येणार असल्याचे सोमवारी सांगण्यात आले. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर ) इमारतीचे भूमिपूजन व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी ते येणार आहेत.

हेही वाचा >>> कोल्हापूर : विशाळगडच्या हिंसक कारनाम्यात पत्रकारांची सुरक्षा वाऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे झालेल्या जनसन्मान मेळाव्यात बोलताना शहा यांना भेटल्याचे सांगून या भेटीत त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले. तसेच, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात दहा हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करा, असा निरोप देण्यासही शहा यांनी सांगितले आहे.यापूर्वी पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपरोक्त दोन इमारतींच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री शहा येणार असल्याचे जाहीर केले होते. आता उपमुख्यमंत्री पवार यांनी या संदर्भाचा उल्लेख केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिविषेश रुग्णालय  

शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० खाटचे अद्ययावत रुग्णालय होणार असून त्यामध्ये ६०० खाटचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० खाटचे कर्करोग रुग्णालय आणि २५० खाटचे अतीविषेश ( सुपर स्पेशलिटी) रुग्णालय होणार आहे.