कोल्हापूर : कोल्हापूर शहरात वडाच्या झाडाचे पूजन व वटपौर्णिमेचा विधी पारंपरिक पद्धतीने करण्यात आला. तर इचलकरंजी महापालिकेच्यावतीने वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आले.

वटपौर्णिमा निमित्त आज काठापदराच्या हिरव्या साड्या परिधान करुन महिलांनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. महालक्ष्मी मंदिर, कळंबा, फुलेवाडी, रूईकर कॉलनी, बावडा, शाहूपुरी, टाउन हॉल परिसर, शिवाजी विद्यापीठ परिसर येथे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केलेली होती. एकमेकींना वाण देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडांच्या रोपांचे वृक्षारोपण

इचलकरंजी महानगर पालिका वर्धापन दिन आणि वटपौर्णिमेचे औचित्य साधून आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील , अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदेयांनी आज शहीद भगतसिंग उद्यान आणि अलायन्स रुग्णालय परिसरात तर कोले मळा येथे महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांचे वृक्षारोपण केले. पर्यावरणाचे संवर्धना साठी इचलकरंजी स्वच्छ, सुंदर आणि हरीत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले. यावेळी ५० वडाच्या तसेच १०० इतर देशी प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.