कोल्हापूर: घराचा उतारा देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी शुक्रवारी पकडला गेला. गोरख दिनकर गिरीगोसावी, (वय ५०, प्रयाग चिखली, ता.करवीर, सद्या रा. कणेरीवाडी,मूळ पुणे जिल्हा) असे त्याचे नाव आहे.

तक्रारदार यांना कर्ज प्रकरण मंजुरी मिळवण्याकरीता राहते घराचा गावठाण उतारा ग्रामपंचायत प्रयाग चिखली येथून पाहिजे होता. तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी गिरीगोसावी यांनी दोन हजार लाच मागितली. लाच रक्कम तक्रारदारकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.