News Flash

सूर्यकुमारचे दुसरे शतक

सूर्यकुमार-आकर्षित यांनी दुसऱ्या गडय़ासाठी २१४ धावांची भागीदारी रचली.

(संग्रहित छायाचित्र)

डी. वाय. पाटील क्रिकेट स्पर्धा

मुंबईचा उदयोन्मुख फलंदाज सूर्यकुमार यादवने (१४३ धावा) साकारलेल्या दुसऱ्या शतकाच्या बळावर बीपीसीएल संघाने डी. वाय. पाटील चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत डी. वाय. पाटील संघाला १०० धावांनी धूळ चारली.

प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमारने ६३ चेंडूंत सात चौकार आणि तब्बल १४ उत्तुंग षटकारासह १४३ धावा फटकावल्यामुळे बीपीसीएलने २० षटकांत ४ बाद २६० धावा केल्या. आकर्षित गोमेलनेसुद्धा ४९ चेंडूंत १०१ धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार-आकर्षित यांनी दुसऱ्या गडय़ासाठी २१४ धावांची भागीदारी रचली. प्रत्युत्तरात डी. वाय. पाटील संघाचा डाव १७.५ षटकांत १६० धावांत आटोपला. शिवम मल्होत्राने तीन बळी मिळवले.

अन्य लढतीत डी. वाय पाटील ‘अ’ संघाने जैन इरिगेशनवर ५५ धावांनी मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 1:32 am

Web Title: 2nd century of suryakumar yadav abn 97
Next Stories
1 महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धेत ‘बीसीसीआय’कडून एका संघाची वाढ
2 ऋषभ पंत म्हणजे BCCI ची ‘गलती से मिस्टेक’!
3 Video : बजाओ…! मैदानाबाहेरही रंगला भारत-श्रीलंका सामना
Just Now!
X