14 October 2019

News Flash

आकाश टायगर्स, सोबो सुपरसोनिक्सची विजयी सलामी

अंजदीप लाडने दोन, तर अर्जुनने एक गडी बाद केला.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई ट्वेन्टी-२० क्रिकेट लीग

अर्जुन तेंडुलकरच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर आकाश टायगर्स मुंबई पश्चिम उपनगर संघाने मंगळवारपासून सुरू झालेल्या मुंबई ट्वेन्टी-२० लीग क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात ट्रम्प नाइट मुंबई उत्तर-पूर्व संघाला पाच गडी राखून नमवले.

प्रथम फलंदाजी करताना अनुभवी सूर्यकुमार यादवच्या ५६ चेंडूंतील ९० धावांच्या नाबाद तुफानी खेळीमुळे ट्रम्प नाइटने २० षटकांत ६ बाद १४७ धावांपर्यंत मजल मारली. अंजदीप लाडने दोन, तर अर्जुनने एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरात आकर्षित गोमेल (४१) आणि अर्जुन (२३) यांच्या उपयुक्त योगदानामुळे आकाश टायगर्सने १४८ धावांचे लक्ष्य पाच फलंदाजांच्या मोबदल्यात १९.३ षटकांत गाठले.

दुसऱ्या लढतीत पराग खानापुरकरच्या ९६ धावांमुळे सोबो सुपरसोनिक्स संघाने आर्क्‍स अंधेरीला ४८ धावांनी धूळ चारली.

First Published on May 15, 2019 1:50 am

Web Title: aakash tigers sobo supersonicss winning salute