सर्व संघांनी पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) उर्वरित सामन्यांसाठी तयारी सुरू केली आहे. यात जे खेळाडू खेळणार नाहीत, त्यांच्याबदली इतर खेळाडूंची शोधमोहीम सुरू आहे. मुल्तान सुलतान्स संघाने वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायरचा संघात समावेश केला आहे. याशिवाय त्यांनी यष्टीरक्षक फलंदाज जॉन्सन चार्ल्ससोबतही करार केला आहे. क्वेटा ग्लेडीएटर्सने अफगाणिस्तानचा चायनामन फिरकीपटू झहीर खानला संघात स्थान दिले आहे. लाहोर कलंदर्स संघाने सर्वांना चकित करत सिंगापूरचा अष्टपैलू टीम डेव्हिडला संघात स्थान दिले आहे.

शिमरॉन हेटमायरबद्दल बोलायचे झाले, तर तो टी-२० क्रिकेटमधील जबरदस्त खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये तो २००च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करीत होता. हा त्याचा पहिला पीएसएल सीझन असेल. जॉन्सन चार्ल्स यापूर्वी पीएसएलमध्ये खेळला आहे. २०१८-१९च्या हंगामात मुलतान सुलतान्सकडून खेळताना जबरदस्त फलंदाजी केली होती.

WISDENने निवडला भारताचा सर्वोत्तम कसोटी संघ, धोनीला ठेवले संघाबाहेर

अफगाणिस्तानचा फिरकीपटू झहीर खान अद्याप पीएसएल आणि आयपीएल या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळलेला नाही. त्याने बिग बॅश लीगमध्ये भाग घेतला आहे. त्याने या स्पर्धेतील १८ सामन्यांत १४ बळी घेतले आहेत. टीम डेव्हिडला अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत ४० टी-२० सामने खेळले आहेत आणि ३५.०३च्या सरासरीने ९४६ धावा केल्या आहेत, गोलंदाजीत त्याने ५ बळीही घेतले आहेत.

करोना विषाणूमुळे पाकिस्तान सुपर लीगला तहकूब करावे लागले. २० फेब्रुवारी रोजी कराची येथे या स्पर्धेला सुरुवात झाली. १४ सामन्यांनंतर ही स्पर्धा थांबवावी लागली. आता या स्पर्धेची सुरुवात १ जूनपासून होईल आणि अंतिम सामना २० जून रोजी होईल.

कुस्तीपटू सुशील कुमारला अटक; दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या