न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीने अंबाती रायुडू गोलंदाजी करण्यावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात रायुडूने गोलंदाजी केली होती. यावेळी त्याच्या शैलीबद्दल आक्षेप घेण्यात आला होता.

या सामन्यानंतर आयसीसीने अंबाती रायुडूला 14 दिवसांची मुदत देऊन, आपल्या समोर हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र रायुडूने हजर न राहणं पसंत केल्यामुळे आयसीसीने त्याच्यावर ही कारवाई केल्याचं समजतंय. यामुळे आगामी सामन्यांमध्ये अंबाती रायुडू वन-डे सामन्यांमध्ये गोलंदाजी करु शकणार नाहीये.