नवी दिल्ली : करोनाच्या साथीतून जग सावरत असताना नँटिस (फ्रान्स) येथे झालेल्या अ‍ॅलेक्सिस व्हॅस्टिने बॉक्सिंग स्पर्धेत जागतिक रौप्यपदकविजेता अमित पंघाल (५२ किलो), आशीष कु मार (७५ किलो) आणि संजीत (९१ किलो) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आणि राष्ट्रकु ल रौप्यपदक विजेत्या अमितने अमेरिकेच्या रेने अब्राहमला ३-० अशी धूळ चारली. भारतीय खुल्या बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संजीतने फ्रोन्सच्या सोहेब बौफियाचे आव्हान मोडीत काढले. आशियाई रौप्यपदक विजेत्या आशीषला अमेरिके चा प्रतिस्पर्धी जोसेफ ग्रेरामी हिक्सने दुखापतीमुळे माघार घेतल्याने विजेता ठरवण्यात आले. तथापि, आशियाई रौप्यपदक विजेत्या कविंदर सिंग बिश्तला ५७ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फ्रान्सच्या सॅम्युएल किस्टॉहरीने त्याला २-१ असे पराभूत के ले.

उपांत्य फे रीत पराभूत झालेल्या  शिवा थापा (६३ किलो), सुमित सांगवान (८१ किलो) आणि सतीश कु मार (+९१ किलो) या भारताच्या तिघांना कांस्यपदके  मिळाली.