आशियाई खेळांच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा नेमबाजांनी भारतासाठी पदकाची कमाई केली आहे. २५ मी. पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनौबतने सुवर्णपदकाची कमाई केली. पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपलं अव्वल स्थान कायम राहिलं होतं. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे ४-४ गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावे केलं

मात्र याच प्रकारात भारताच्या १६ वर्षीय मनू भाकेरला पदकाच्या शर्यतीमधून बाहेर प़डावं लागलं. पात्रता फेरीत अव्वल दर्जाची कामगिरी करत पहिलं स्थान कायम राखलेल्या मनूला अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला संभावित एका पदकावर पाणी सोडावं लागलं. कुस्तीमध्ये आज भारताला निराशा सहन करावी लागली. भारताचा एकही मल्ल आज पदकाची कमाई करु शकला नाही.

मात्र दुसरीकडे वुशू या खेळात भारताला ४ कांस्यपदकं मिळाली. महिलांमध्ये ६० किलो वजनी गटात भारताच्या रोशिबीना देवी आणि ५६ किलो वजनी गटात संतोष कुमार यांनी कांस्यपदकाची कमाई केली. ६५ किलो वजनी गटात नरेंद्र गेरवाललाही कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. याचसोबत ६० किलो वजनी गटात भारताच्या सूर्या सिंहला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सूर्यालाही कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

Live Blog

18:58 (IST)22 Aug 2018
वुशूत भारताला आणखी एक पदक

६५ किलो वजनी गटात भारताच्या नरेंद्र गेरवालला कांस्यपदक

18:45 (IST)22 Aug 2018
वुशू

18:39 (IST)22 Aug 2018
जलतरण - ४*१०० रिले

भारताची जोडी अंतिम फेरीत शेवटच्या स्थानावर

18:33 (IST)22 Aug 2018
कुस्ती - पुरुष

कांस्यपदकाच्या लढतीत भारताचा हरप्रीत सिंह पराभूत. चौथ्या दिवशी कुस्तीमध्ये भारताची झोळी रिकामीच

18:28 (IST)22 Aug 2018
वुशू - पुरुष

५६ किलो वजनी गटात भारताच्या संतोष कुमारला कांस्यपदक

18:25 (IST)22 Aug 2018
वुशू - महिला

६० किलो वजनी गटात भारताच्या रोशिबीना देवीला कांस्यपदक

17:29 (IST)22 Aug 2018
टेनिस - पुरुष

भारताचे सुमीत नागपाल आणि रामकुमार रामनाथन जोडी पराभूत.  कांस्यपदकासाठीच्या सामन्यासाठी भारतीय जोडी पात्र, भारताचं टेनिसमध्ये आणखी एक पदक निश्चीत

17:26 (IST)22 Aug 2018
जलतरण

भारतीय पुरुष खेळाडू अंतिम फेरी गाठण्यात अपयशी

15:55 (IST)22 Aug 2018
टेनिस - दुहेरी पुरुष

भारताची रोहन बोपण्णा - दिवीज शरण जोडी उपांत्य फेरीत दाखल. टेनिसमध्ये भारताला आणखी एक पदक निश्चीत

15:53 (IST)22 Aug 2018
कुस्ती पुरुष

हरदीप उझबेगिस्तानच्या मल्लाकडून पराभूत, रेपिचाज प्रकारात गुरप्रीत चीनच्या मल्लाकडून पराभूत

14:28 (IST)22 Aug 2018
२५. मी. पिस्तुल नेमबाजी - महिला

भारताच्या राही सरनौबतला सुवर्णपदक, शूटऑफमध्ये थायलंडच्या खेळाडूवर ३-२ ने केली मात. एशियाडमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक मिळवणारी राही पहिली भारतीय महिला

१६ वर्षीय मनू भाकेर मात्र पदकाच्या शर्यतीमधून बाहेर

13:40 (IST)22 Aug 2018
कुस्ती - पुरुष

७७ किलो वजनी गटात गुरप्रीत सिंह इराणच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभूत

८७ किलो वजनी गटात हरप्रीत सिंह उपांत्य फेरीत दाखल, उपांत्य फेरीत हरप्रीत पराभूत. उझबेगिस्तानच्या मल्लाने केला पराभव. हरप्रीत कांस्यपदकासाठी खेळणार

12:37 (IST)22 Aug 2018
नेमबाजी - महिला

२५ मी.पिस्तुल प्रकारात भारताची राही सरनौबतही अंतिम फेरीत दाखल. राही आणि मनू भाकेर अंतिम फेरीत पदकासाठी लढणार

12:31 (IST)22 Aug 2018
जिमनॅस्टीक

दिपा कर्माकरची दुखापतीमुळे माघार

12:01 (IST)22 Aug 2018
कुस्ती - पुरुष

८७ किलो वजनी गटात हरप्रीत सिंहची कोरियाच्या प्रतिस्पर्ध्यावर ४-१ ने मात७७ किलो ग्रेको रोमन वजनी गटात गुरप्रीत सिंहची थायलंडच्या प्रतिस्पर्ध्यावर मात१३० किलो ग्रेको रोमन वजगी गटात भारताचा नवीन चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभूत

11:37 (IST)22 Aug 2018
टेनिस पुरुष

रामकुमार रामनाथन पराभूत

10:34 (IST)22 Aug 2018
जलतरण - पुरुष

४*१०० मी. फ्रिस्टाईल रिले प्रकारासाठी भारतीय संघ पात्र.

१०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात संदीप शेजवळचं आव्हान संपुष्टात

10:30 (IST)22 Aug 2018
नेमबाजी महिला

५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात अंजुम मुद्गील आणि गायत्री नित्यानंदन स्पर्धेतून बाहेर.

10:28 (IST)22 Aug 2018
रोविंग - महिला

भारताचा महिला संघही अंतिम फेरीत दाखल

10:18 (IST)22 Aug 2018
टेनिस महिला एकेरी - भारताचं एक पदक निश्चीत

भारताची अनिता रैना उपांत्य फेरीत दाखल. उपांत्यपूर्व फेरीत अनिता रैनाची हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ६-४, ६-१ ने मात

10:15 (IST)22 Aug 2018
नेमबाजी महिला

२५ मी. पिस्तुल प्रकारात भारताची मनू भाकेर अंतिम फेरीत दाखल. पात्रता फेरीत मनू भाकेर प्रथम स्थानावर

09:39 (IST)22 Aug 2018
रोविंग

पुरुषांच्या लाईटवलेट प्रकारात भारताचा संघ अंतिम फेरीत दाखल

रोहित कुमार आणि भगवान सिंह लाईटवेट स्कल्स प्रकारात अंतिम फेरीत