07 July 2020

News Flash

प्रो कुस्ती लीग : बजरंग पुनिया पंजाबकडे, विनेश फोगटसाठी मुंबईची बोली

अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगटला मुंबई महारथी संघाने २५ लाख रुपयांच्या बोलीवर संघात घेतले.

बजरंग पुनिया, विनेश फोगट

गुरुग्राम : प्रो कुस्ती लीगमधील सहा संघांसाठी झालेल्या लिलावात पंजाब रॉयल्सने बजरंग पुनियाला ३० लाख रुपये, तर अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगटला मुंबई महारथी संघाने २५ लाख रुपयांच्या बोलीवर संघात घेतले.

एमपी योद्धा, दिल्ली सुलतान, यूपी दंगल, हरियाणा हॅमर्स, मुंबई महारथी आणि पंजाब रॉयल्स या सहा संघांनी प्रत्येकी नऊ याप्रमाणे ५४ मल्लांची त्यांच्या संघात निवड केली. तब्बल २२५ मल्लांमधून या मल्लांची निवड करण्यात आली. त्यात दिल्ली सुलतानने रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती मल्ल साक्षी मलिकला २० लाखांची तर रशियाच्या खेतिक सॅबलॉवला २५ लाख रुपयांची बोली लावली.

बेलारूसच्या वेनेसा कलादझिंक्सायाला यूपी दंगलने २५ लाख रुपयांना लावलेली बोली ही विदेशी मल्लांसाठीची सर्वाधिक रकमेची ठरली. राहुल आवारे आणि रशियाचा खेतिक सॅबोलोवला दिल्ली सुलतानने तर पूजा धांडाला एमपी योद्धा संघाने आपल्या संघात स्थान दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2019 1:01 am

Web Title: bajrang punia goes to punjab mumbai bag vinesh phogat in pwl
Next Stories
1 IND vs AUS : कर्णधार विरूद्ध गोलंदाज; ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये मैदानावरच राडा
2 IND vs AUS : …..त्यावेळी मी देखील थोडा घाबरलो होतो – ऋषभ पंत
3 IND vs AUS : ऋषभ पंतने शतकाचं क्रेडीट दिलं रविंद्र जाडेजाला
Just Now!
X