भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीने माजी फलंदाज राहुल द्रविड याच्यासमोर भारतीय संघास प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे.
बीसीसीआयने नियुक्त केलेल्या मुख्य सल्लागार समितीने राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली आहे. या समितीमध्ये भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांचा समावेश आहे.
प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आल्यास द्रविड याला काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यासाठीही बीसीसीआयने अनुकूलता दर्शविली आहे. द्रविडसमोर मांडण्यात आलेला प्रस्तावित करार हा मोठ्या काळासाठीचा असून त्याची कालमर्यादा २०१९ च्या विश्‍वकरंडकापर्यंत असण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.