26 January 2020

News Flash

अभिमानास्पद! ऐश्वर्या ठरली ‘मोटरस्पोर्ट्स’मध्ये विश्वविजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय

२३ व्या वर्षी रचला इतिहास

FIM World Cup स्पर्धेत बंगळुरूच्या ऐश्वर्या पिसेने महिलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. मोटरस्पोर्ट्स प्रकारात विश्वचषक स्पर्धेत मिळवणारी ऐश्वर्या पहिलीच भारतीय ठरली.

ऐश्वर्या पिसे

 

मोटरस्पोर्ट्स या खेळामध्ये भारताकडून खेळणारे खेळाडू फार कमीच दिसतात. तशातच २३ वर्षीय ऐश्वर्या पिसे हिने या क्रीडा प्रकारात विश्वविजेतेपद जिंकून इतिहास रचला आणि भारताची मान उंचावली. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ऐश्वर्या पिसे

 

ऐश्वर्याने दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत बाजी मारली होती. त्यानंतर पोर्तुगालमध्ये झालेल्या फेरीत तिने तिसरे स्थान पटकावले होते. तसेच, ती स्पेनमधील फेरीत पाचव्या, तर हंगेरीत चौथ्या क्रमांकावर होती. तिच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर तिने एकूण ६५ गुण कमावले आणि तिने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. पोर्तुगालची रिटा हिने ६१ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. ज्युनियर गटात ऐश्वर्याला ४६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

ऐश्वर्या पिसे

 

विजेतेपद मिळाल्यावर ती फारच भावनिक झाली. “काय बोलावे याबद्दल मला काहीच सुचत नाहीये. गेल्या वर्षी स्पेनमध्ये माझा अपघात झाला होता. त्या वेळी दुखापतीमुळे माझी कारकीर्दच संपुष्टात येण्याची भीती होती. तो काळ खूप कठीण होता. पण मी जिद्द सोडली नाही. मी पुन्हा बाईकवर स्वार झाले. मी स्वत:ला अपघातातून सावरले आणि विजेतेपदाला गवसणी घातली. म्हणूनच विश्वचषक जिंकणे ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे,” अशा भावना तिने व्यक्त केल्या.

First Published on August 13, 2019 8:36 pm

Web Title: bengaluru aishwarya pissay becomes first indian to win world cup title in motorsports vjb 91
Next Stories
1 Ashes 2019 : दणदणीत विजयानंतरही ऑस्ट्रेलियाच्या संघातून ‘या’ खेळाडूला डच्चू
2 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडने युवराजवर केला ‘हा’ आरोप
3 Video : ‘टारझन’ श्रेयस – ‘गब्बर’ धवनची जंगलातली मस्ती पाहिलीत का?
Just Now!
X