News Flash

बाप रे बाप! उगाच असल्या अफवा पसरवू नका – भुवनेश्वर कुमार

प्रसारमाध्यमांमध्ये चालवण्यात आलेल्या बातम्यांमुळे सध्या तो हैराण झाल्याचे दिसत आहे.

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा सध्या क्रिकेटपासून काही काळ दूर आहे. २०१९मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तंदुरुस्ती राहावी म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पण प्रसारमाध्यमांमध्ये चालवण्यात आलेल्या बातम्यांमुळे सध्या तो हैराण झाल्याचे दिसत आहे. या बाबत त्याने एक ट्विट करून आपला राग व्यक्त केला आहे.

या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की प्रसारमाध्यमांनी अशाप्रकारे चुकीच्या बातम्या पसरवणे थांबवा. कोणतीही शहानिशा न करता प्रसारमाध्यमांनी मी बाबा होणार असल्याचे वृत्त दिले आहे. पण या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे त्याने म्हटले आहे.

एका वृत्तपत्राचे नाव ट्विटमध्ये मेन्शन करून त्याने असे म्हटले आहे की मी बाबा होणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये दिसून येत आहे. कृपा करून कोणतीही खात्री केल्याशिवाय केवळ बातमी बनवण्यासाठी अशा बातम्या देऊ नका. मी प्रत्येकाला विनंती करतो की कोणीही अशा चुकीच्या बातम्या पसरवू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 6:41 pm

Web Title: bhuvneshwar kumar says media reports of him becoming father false
टॅग : Bhuvaneshwar Kumar
Next Stories
1 श्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर ICCने केले भ्रष्टाचाराचे आरोप
2 १८ वर्षाचे असताना आमचा खेळ पृथ्वी शॉच्या १०% टक्केही नव्हता – विराट कोहली
3 ‘मेसी सामन्याआधी २० वेळा टॉयलेटला जातो’; दिग्गज फुटबॉलपटू मॅरोडोनाची विखारी टीका
Just Now!
X