22 January 2021

News Flash

Video: मुलाखत सुरू असतानाच चिमुरडी क्रिकेटपटूच्या मांडीवर येऊन बसली अन्…

व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल हसू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी २७ नोव्हेंबर २०२० हा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी भारत-ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड-दक्षिण आफ्रिका अशा दोन रोमांचक मालिकांना सुरूवात होणार आहे. करोनाच्या भीतीपोटी बंद असलेलं क्रिकेट सुरू झालं होतं, पण मोठ्या प्रमाणावर विदेश दौरे करण्यास संघ तयार दिसत नव्हते. पण आता मात्र सर्व संघ विदेशी जमिनीवर जाऊन क्रिकेट खेळण्यासाठी तयार असल्याचं दिसत आहे. इंग्लंडचा आफ्रिका दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. आधी ३ टी२० सामन्यांची मालिका आणि नंतर ४ डिसेंबरपासून ३ वन डे सामने असा दौऱ्याचा कार्यक्रम आहे. याच दौऱ्याबाबत मुलाखत देताना इंग्लंडच्या एका स्टार खेळाडूच्या बाबतीत मजेशीर किस्सा घडला.

इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर ऑनलाईन पद्धतीने पत्रकारांना मुलाखत देत होता. विविध प्रश्नांची तो उत्तरं देत होता. त्याची मुलाखत सुरू असतानाच एक अतिशय मजेशीर घटना घडली. मुलाखतीच्या दरम्यान बटलरची दीड वर्षाची चिमुरडी थेट आपल्या बाबांच्या जवळ आली. बटलरने उत्तर देताना या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली, पण चिमुरडी तिथून गेली नाही. अखेर बटलरने थेट तिला आपल्या मांडीवर बसवलं आणि उत्तर द्यायला सुरूवात केली.

पाहा मजेशीर व्हिडीओ-

दरम्यान, जोस बटलरने IPL 2020मध्ये राजस्थानकडून सुरूवातीला चांगली कामगिरी केली होती, पण नंतरच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत सातत्याने झालेल्या बदलांमुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 2:30 pm

Web Title: comedy video england cricketer jos buttler interview interrupted by daughter watch vjb 91
Next Stories
1 पुढील हंगामासाठी पंजाबने ख्रिस गेलचा विचार करु नये, आकाश चोप्राचा सल्ला
2 IND vs AUS: “विराट कोहलीची टीम इंडियामधील अनुपस्थिती म्हणजे…”
3 IND vs AUS: क्रिकेट मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाला धक्का; वेगवान गोलंदाजाची माघार
Just Now!
X